घोडेगाव पुणे 3/9/2025
अय्युब शेख
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव च्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घोडेगाव येथील पोलीस स्टेशनला विनंती वजा निवेदन पत्र दिले आहे…
दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घोडेगाव येथील घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सदर निवेदन देण्यात आले आहे..
दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घोडेगाव पोलीस स्टेशनला जवळजवळ वीस ते पंचवीस पुरुष व महिला अधिकारी व कर्मचारी यांनी विनंती निवेदन पत्र दिले आहे व या पत्राच्या विविध प्रती ह्या माननीय मुख्यमंत्री व आदिवासी विकास विभाग तसेच गृह मंत्रालय व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आले आहे..
मागील पंधरा दिवसांपूर्वी एकात्मिक विकास विभाग प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप सुनिता बानाजीराव देसाई यांच्यावर जुन्नर तालुक्यातील सोनावळे येथील आश्रम शाळेतील एका महिला शिक्षिकेने एक वर्षांपूर्वीच्या सभेचा आधार घेऊन विनयभंगाचे तसेच काही इतर आरोप केलेले आहेत..
जुन्नर पोलीस स्टेशन ने सदर तक्रारींची शहानिशा न करता व विशाखा समिती किंवा विभागीय समितीची नेमणूक न करता अशा प्रकारे वर्ग दर्जा दोन च्या अधिकारी यांच्यावर अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करून घेतला तो अशा स्वरूपात दाखल करून घेणे म्हणजे अशा प्रकारे आमच्यासारखे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अन्याय आहे असे निवेदन पत्र मध्ये म्हटले आहे… आदिवासी विकास विभागाच्या 23 विनाअनुदानित आश्रम शाळा नो अनुदानित आश्रम शाळा व 24 शासकीय वस्तीगृह यामध्ये या विभागाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी काही वैयक्तिक व सामूहिक योजनांची अंमलबजावणीची गरज असते सदर अंमलबजावणी करत असताना अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रचंड ताण असतो तरीही शिक्षक अधिकारी कर्मचारी त्यांचे कार्य हे समाजासाठी अहोरात्र करत असतात…
अशावेळी या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काही समाजातील व्यक्ती हे एक प्रकारे ताण आणण्याचा प्रयत्न करतात त्यांना ठेके द्या..त्रुटीयुक्त कामे अपूर्ण असताना पूर्ण देयके अदा करा.निविदा भरण्यासाठी.. व दर्जाहीन व निकृष्ट सेवा देणाऱ्या कंत्राट दारावर कारवाई न करण्यासाठी दबाव आणला जात असतो असा आरोप निवेदन पत्र मध्ये केला आहे.. व कुरवंडी येथील एका आदिवासी विकास संस्थेची अंडी भाजीपाला गोड पदार्थ चिकन व मटन सप्लाय करण्याची एकच निविदा आल्यामुळे प्रत्यक्षात तीन दर पत्रक निविदा आवश्यक होत्या निविदा आचारसंहितेच्या नियमानुसार मुख्याध्यापक स्तरावर रद्द करण्यात आली होती.. त्यामुळे कार्यवाही मुख्याध्यापक स्तरावर करण्यात आली होती अशावेळी एकच निविदा असणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका यांनी आपल्याला काम न मिळाल्याच्या रागातून प्रकल्प अधिकारी देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर स्वतः आरोप घोडेगाव पोलीस स्टेशन ला मागे घेत आहोत असे पत्र सुद्धा त्यांनी दिले होते व दिलगिरी व्यक्त केली होती..
व त्यानंतर 2025 मध्ये सप्टेंबर महिन्यात ह्याच संस्थापिकाने एका जुन्नर च्या खाजगी वृत्तवाहिनीवर प्रकल्प अधिकारी देसाई यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाचे असे तथ्यहीन आरोप केले होते..
जर काही खाजगी संस्था चालवणारे संस्थापक व खात्याचे निविदा न मिळाल्याच्या रागातून जर प्रकल्प अधिकारी सारख्या व्यक्तीला खोट्या केसेसमध्ये अडकवले जात असेल व खोटे गंभीर आरोप केले जात असेल व मानसिक खच्चीकरण केले जात असेल तर आमच्यासारख्या त्यांच्यापेक्षा कमी पदाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सुद्धा भविष्यामध्ये असे गंभीर आरोप होऊ शकतात अशी आम्हाला भीती आहे असे निवेदन पत्रामध्ये म्हटलेले आहे त्यामुळे येथून पुढे जर पोलिसांना काही गुन्हे दाखल करायचे असल्यास त्यांनी विशाखा समिती किंवा विभागीय समिती नेमणूक करून विपक्षपातीपणे चौकशी करून तर ती आढळल्यास गुन्हे दाखल करावेत अशी गुन्हे दाखल करू नयेत व आमची मानसिक खच्चीकरण करणे अशा स्वरूपाची भीती निवेदनामध्ये कर्मचारी व अधिकारी यांनी सह्या केलेल्या निवेदन मध्ये न्हटले आहे……
…


