संपादक अय्युब शेख दिनांक 11/10/2025
पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 वर वारूळ वाडी हद्दीमध्ये कलासागर मंगल कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला दिनांक 11 च्या पहाटे अज्ञात थंडीपासून शेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकाने शेकोटी तशीच ठेवल्यामुळे त्यानंतर तीन ते चार तासाने सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्या कचऱ्याने पेट घेतला व मोठी आग लागल्याची घटना घडली..
ही घटना दक्ष पत्रकार आयुब शेख यांनी तात्काळ वन खात्याला व पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायणगाव पोलीस स्टेशनला तसेच कलासागर मंगल कार्यालयाचे संचालक अरुण शेठ भुजबळ यांना व पर्यावरण प्रेमी आदिल शेख यांना कळवली…
त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल मिडगुले यांनी व अरुण भुजबळ पत्रकार आयुब शेख व सांगली येथील नारायणगावच्या दिशेने जाणारा एक पिकप चालक सुरज बोरकर इत्यादींनी आग बादलीने पाणी ओतून अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला…
परंतु आग आटोक्यात येत नाही व मोठमोठी जी 100 वर्षांपूर्वीची वडाची झाडे आहे तो जळण्याचा धोका होता म्हणून नारायणगावचे उपसरपंच बाबुभाई पाटे यांना फोन करून अग्निशामक यंत्रणा बोलवण्यात आली..
सुशांत भुजबळ यांनी योगेश भाऊ पाटे यांना फोन केल्यानंतर त्वरित योगेश बाबू पाटे व त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर आग ही आटोक्यात आणण्यात आली…
योगेश बाबू यांच्या समवेत त्यांचे मित्र योगेश तोडकरी तसेच आरिफ भाई आतार व इतर मान्यवर मंडळी ही मदतीसाठी धावून आली सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आग आटोक्यात आणण्यात आली.. सदर अग्निशामक यंत्रणा त्वरित उपलब्ध झाल्यामुळे व जुन्नर वनखाते लवकर पोहोचले त्यामुळे मोठ-मोठी जी 100 वर्षांपूर्वीचे वडाची झाड आहेत तो जळण्याचा धोका हात आता टाळला आहे… सदर वृक्षसंपदेचे नुकसान टाळल्यामुळे व पर्यावरण प्रेमींनी मदत केल्यामुळे सर्वत्र नारायणगाव परिसरात व तालुक्यात चांगली चर्चा होत आहे

