पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नारायणगाव उपबाजार अंतर्गत धना मेथीच्या बाजाराचे नवीन जागेत स्थलांतर उद्घाटन समारंभाचे संपन्न झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय संजय काळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते नॅशनल हायवे अथोरिटी पुणे क्रमांक 60 च्या सर्विस रोडचे उद्घाटन संपन्न मारुती शोरूम शेजारील नारायणगाव उपबाजार आवाराजवळ संपन्न झाले .9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सदर उदघाट्न सोहळा संप्पन्न झालाय
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या या सर्विस रोडचे उद्घाटन शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचे हस्ते झाले व धनामेथी च्या स्थलांतरित मार्केटचे उद्घाटन अगोदर दिवंगत शिवाजीराव काळे यांच्या प्रतिमा पूजनाने व सेल वॉल च्या उदघाटन ने झाले..
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या शेजारी व गणपीर देवस्थान डोंगराच्या पायथ्याला असलेली 13 एकर विस्तीर्ण जागा आहे धना मेथी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शेठ काळे यांनी सदर ठिकाणी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे..आता येथून पुढे माल गाड्या ज्या येतात व ट्रॅफिकची समस्या होत होती या ठिकाणी भरपूर अशी जागा असल्यामुळे ट्रॅफिकची अडचण होणार नाही व रस्ता सुद्धा चांगल्या दर्जाचा तयार झालेला आहे पाऊस जर आला तर वेळेला ताडपत्रीची जी मोठमोठे शेड बनवण्यात आले आहे त्या शेडचा आधार शेतकऱ्यांना घेता येणार आहे… चार सेल वॉल चे उदघाटन संपन्न झाले.. शेतकऱ्यांमध्ये सदर मार्केट ओपन झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे व सभापती संजय काळे यांना धन्यवाद देण्यात येत आहे…

