जुन्नर नारायणगाव (अय्युब शेख)नगदवाडी- केंद्रशाळेचे जुन्नर तालुकास्तरीय कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांत उल्लेखनीय यश👌💐💐💥🖊️
नगदवाडी ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेने जुन्नर तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांत उल्लेखनीय यश संपादन केल्याची माहिती केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे यांनी दिली.
शिवनेरी स्कूल खानापूर येथे जुन्नर तालुक्यातील 10 शैक्षणिक बीट,32 केंद्रातील 356 शाळांमधील विद्यार्थी स्पर्धकांनी वैयक्तिक व सांघिक स्पर्धांत उत्साहात सहभाग घेतला.तालुकास्तरीय स्पर्धांत नगदवाडी शाळेतील रंजना रमेश चव्हाण हिने उंच उडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर 50 मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच पार्थ महेंद्र काळे व जोया फिरोज अन्सारी यांनी प्रश्नमंजुषा या बौद्धिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विशेष नैपुण्य प्राप्त केले.
सर्व यशस्वी स्पर्धक व खेळाडूंना केंद्रशाळेतील शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,सुप्रिया अभंग,आशा आरेकर,उज्वला कांबळे व अश्विनी जगदाळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षकांचे जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे,शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोडसे,विष्णु धोंडगे,केंद्रप्रमुख वनिता हांडे,मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे,कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,उपाध्यक्ष भावना बढे,शाळा सल्लागार समिती अध्यक्ष सुरेश बढे,उपाध्यक्ष शिवशंकर मांडे,नगदवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट बढे,तानाजी बढे,निलेश बढे,संगिताताई बढे,दिपाली जाधव,अक्षदा जाधव,महेश बढे,दिनेश कुतळ,रघुनाथ बढे,विलास बढे,गणेश कुतळ,रवींद्र काळे,सुभाष बढे,दयानंद बढे तसेच नगदवाडी ग्रामस्थ,पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
